माळशिरस : पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये 'बी' श्रेणी प्राप्त झाली आहे. सोलापूर विद्यापीठातील संगणक महाविद्यालयामध्ये नॅक मूल्यांकन करणारे हे पहिलेच विनाअनुदानित महाविद्यालय ठरले आहे.
यासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. ए. पवार, प्राचार्य डॉ. एम. पी. गद्रे, उपप्राचार्य आर. आर. डावकरे यांनी मार्गदर्शन केले. सहा. प्रा. जी. एस. मदने यांनी या समितीत नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव श्रीलेखा पाटील, सहसचिव करण पाटील, ॲड. अभिषेक पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी दिनेश शिंदे यांनी कौतूक केले आहे. (वा. प्र.)
---
०१ माळशिरस श्रीराम विद्यालय
श्रीराम महाविद्यालयास नॅक मूल्यांकन प्राप्त झाल्याबद्दल कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व शिक्षक कर्मचारी.