ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा दखल घेतली जात नाही. रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. रस्त्याच्या बाजूला काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरचा रस्ता दिसत नसल्याने अपघात घडत आहेत. हैद्रा हे तीर्थक्षेत्र असल्याने त्वरित नवीन रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे
अक्कलकोट स्टेशन-जेऊर रस्ता दुरुस्त करा
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट स्टेशन-जेऊर ४ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने नवीन रस्ता करावा अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
रकमाबाई काळे प्रशालेत गणवेश वाटप
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथील रकमाबाई जीवबा काळे प्रशालेत प.पू.ष.ब्र.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होटगी यांची ६५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना तसेच प्रशालेतील गरिब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांना विठ्ठलराव खताळ, रतन राठोड, डॉ. प्रा. गणपतराव कलशेट्टी, माजी विद्यार्थी दीपक काळे, दाजी कोळेकर, धुळबा वाघमोडे, मल्लिकार्जुन शिंदे, खंडू खरात यांच्यावतीने गणवेश आणि साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कांतय्या पुरवंतस्वामी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.