माळशिरसच्या प्रशासकीय इमारतीमध्ये लाच स्वीकारताना यातील लोकसेवकास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, स्वप्नील सन्नके यांच्या पथकाने केली.
नगरपंचायत हद्दीतील एप्रिल २०२१ मध्ये सार्वजनिक रस्त्याच्या निविदा निघाल्या होत्या. निविदाधारकांसोबत सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून यातील तक्रारदारांनी करार करून रस्त्याचे व गटारीचे बांधकाम पूर्ण केले होते. कामाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार माळशिरस नगरपंचायतीच्या कार्यालयात पाठपुरावा करीत होते. करारानुसार पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुरीच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या कामाचे मोजमाप करून त्याचे बिल मंजुरीसाठी अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी व ते मंजूर करून देण्यासाठी लोकसेवक कावळे यांनी तक्रारदाराकडे प्रथम १ लाखांची मागणी केली. तडजोडीने ७० हजारांची मागणी करून, त्यामधील पहिला हप्ता म्हणून ३० हजार लाचेची रक्कम प्रशासकीय इमारतीत स्वीकाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
---