मोहोळ : प्रगतशील बागायतदार नागनाथ पुंडलिक वसेकर (६०, रा. पाटकूल, ता. मोहोळ)
यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दीपक बोड्डू
सोलापूर : दीपक नरहरी बोड्डू (५४, रा, जुना विडी घरकूल) यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
दादासाहेब पडवळकर
सोलापूर : दादासाहेब विठ्ठल पडवळकर (३६, रा. शिवाजी नगर, बाळे) यांचे निधन झाले. मागील २० वर्षांपासून भोसरीतील फॅबटेक इंजिनिअरींगमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, भाऊ, भावजय, दोन बहिणी असा परिवार आहे.
बबन महाडीक
चळे : राधानगरीचे उद्योजक बबन शामराव महाडिक ( ६५, रा. पुळूज, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चुलते व पवन महाडिक यांचे वडील होत.
विमल कुलकर्णी
चळे : विमल वसंतराव कुलकर्णी ( ६५, रा. पुळूज, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.
वसंतराव कुंभार
अकलूज : यशवंत नगरचे माजी सरपंच वसंतराव शिवदास कुंभार (६५, रा. यशवंत नगर, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार चंद्रकांत कुंभार यांचे ते बंधू होते.
लक्ष्मण मोरे
चळे : कालची भास्कर आप्पा गायकवाड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लक्ष्मण बाबाजी मोरे ( ६०, रा. चळे, ता. पंढरपूर )यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मथुराबाई गायकवाड
सोलापूर : मथुराबाई शिवशंकर घोडके ( रा. निर्मिती विहार, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
शिवलिंग म्हमाणे
चळे : शिवलिंग मारुती म्हमाणे ( ३८, रा. पुळूज, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ व असा परिवार आहे.
सुनीता वाघमारे
सोलापूर : सुनीता सुनील वाघमारे ( ३६, रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्या गोंधळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील वाघमारे यांच्या पत्नी होत.
लक्ष्मण खरात
चळे : लक्ष्मण भगवान खरात ( ६२, रा. मुढवी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी सरपंच तानाजी भाऊ खरात यांचे वडील होत.