ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,असा नामविस्तार करण्यात आलानामविस्ताराला शिवा संघटनेने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला आहे. या नामविस्ताराला शिवा संघटनेने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र गुरुवारी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिकेत सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
सोलापूर विद्यापीठाबाबत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असतानाही सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. त्यामुळे शिवा संघटनेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.