शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

नाठाळाच्या माथी हाणू काठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 4:18 PM

गोष्ट तशी बºयाच दिवसांची आहे. आळंदीला पुण्याहून जात होतो. सिटी बसमध्ये बरीच गर्दी होती. सायंकाळचे साडेपाच वाजले असतील. शाळा, ...

गोष्ट तशी बºयाच दिवसांची आहे. आळंदीला पुण्याहून जात होतो. सिटी बसमध्ये बरीच गर्दी होती. सायंकाळचे साडेपाच वाजले असतील. शाळा, कॉलेज सुटले होते. मुले-मुलीच ती गर्दीतही मस्ती चालू होती. तितक्यात एक मध्यम उंची, काटक शरीरयष्टी, गळ्यात शबनम लांब गळ्याचा टॉप असलेली मुलगी पुढे सरसावली व टॉपच्या बाह्या मागे सारून एका हाताने त्या मुलास चिडवणाºयांपैकी मस्तीखोरीत पुढे असणाºयाची गच्ची पकडून दुसºया हाताने सणसणीत ठेवून दिली. तशी इतरांची जाम फाटलीच. काय हेऽऽ मघापासून बघतीय.. लय माज हाय मस्तीचा. त्यो बिचारा गप्प राहून सहन करतो आहे म्हणून काहीही करताय ए... कुणाला मस्ती करायची हाय याऽऽ असं म्हणत तिनं ओपन चॅलेंजच दिलं.

दुसºयाच मिनिटाला सारं वातावरण बदललं. त्या साºयांना माफी मागायला लावली आणि त्या पोराला म्हणाली, भावड्या असा राहिलास तर कसं होईल? तोही कसाबसा नाही हो म्हणाला. बाकी प्रवासी मनोमन तिचं फार कौतुक करू लागले. आळंदीला बस कशी आली कळलंच नाही. असाच काहीसा प्रसंग परवा घडला. तसे सर्वत्रच घडतात. खरंच समाजामध्ये मूठभर उपटसुंभ गुंडाची मजल अशा छोट्या-मोठ्या मस्तीतूनच वाढत जाते. १०/५ टक्के अशा अडेलतट्टू, मुजोर मस्तवाल, निर्बुद्ध, स्वयंघोषित गुंडांची दहशत ही समाजव्यवस्थेचा शांतीभंग करण्यात धन्यता मानतात. स्वत:च्या सत्ता, संपत्ती, पैसा, जमीन-जुमला, पद, प्रतिष्ठा, वशिला याच्या बळावर सतत इतरांना वेठीस धरून अशांतता निर्माण करतात.

अनेक वसाहती, गल्ल्या, वस्त्या, वाड्या, खेड्यापाड्यात, मंडळात, वस्तीत, शाळा, कॉलेज, आॅफिस, शिक्षण, प्रशिक्षण, मग ती कोणत्याही क्षेत्रात अशी काही मंडळी कायम वावरत असतात. यांना कामे चांगली होण्याशी काही देणं-घेणं नसतं. फक्त स्वत:चे वेगळेपण मिरवणं व मोठेपणा तसेच ‘मी’पणा जपत राहतात, मग यात सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्क व अधिकार यांची पायमल्ली होते, याचंही काही वाटत नाही व बाकी लोकही कुठं घाणीत दगड टाकून घाण अंगावर घ्या म्हणून निमूट सहन करीत राहतात. कारण शिव्या देणं, अघळपघळ बोलणं, हमरीतुमरीवर येणं असे प्रकार यांचे आवडीचे खेळ. म्हणून सुशिक्षित, शांत, सुखभावी आपण भलं व आपलं काम भलं मानणारी माणसं सारं चुपचाप सहन करीत राहतात. याचाही अर्थ मूर्ख लोक कोण आपल्या वाटेला जात नाही म्हणताना गर्व करतात; पण त्यांना कोण व कसे सांगणार ‘नंगे को खुदा डरे... इन्सान की क्या बात...’

खरंच आज सुशिक्षितपणाची व्याख्याच बदलावी लागेल. मी त्या मुलीस सुशिक्षित म्हणेन. समोर इतकं सारं घडताना शांत राहतो तो सुशिक्षित कसा? १० सुशिक्षित शांतपणे सहन करतात, तेव्हाच एक गुंड तयार होतो; पण आज प्रत्येकाने ‘जगा असे की, कोणी दु:खी होणार नाही व कोणाला त्रास होणार नाही’ व वागा असे की, कोणाची तुम्हाला त्रास देण्याची हिंमत होणार नाही. गुंडाची चूक वेळीच दाखवली तर पुन्हा हिंमत होणार नाही. तुकाराम महाराजांनी आम्हाला समाजामध्ये शांतता, सलोख्याने वागण्याचा सल्ला देतानाच कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केलाच, तर मात्र ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।’ हा उपदेश आज प्रत्यक्षात येण्याची गरज आहे.

आपणा साºयांना थोडंसं भानावर यावं लागेल. लायक माणसं शांत बसू लागली की, नालायक माणसं नको तिथं बसतात. कामातलं गांभीर्य संपतं, गुणवत्ता ढासळू लागते. मन:शांतीला ओहोटी लागते. चूक नसताना सुशिक्षितपणाची शिक्षा भोगावी लागते. शांत राहणे, कुणाचं काहीही शांतपणे सहन करणे म्हणजे ‘स्व’चा अपुरा विकास साधणे होय. जे पटत नाही ते करू नये. स्वत:च्या जाणिवांशी सजग राहणे. एकदम हिंमत होणार नाही; पण प्रयत्न करून पाहा ही फार भेकड माणसं असतात. कुणाच्या कसल्याही बडेजावच्या अंकित न जाता मुक्त, मस्त व व्यस्त राहा. आपलं काम इतकं निर्मळ पवित्र करून त्यांची औकात दाखवून द्या. संपूर्ण दुर्लक्ष करून स्वत:च्या प्रामाणिकपणा व साधेपणाच्या मस्तीत कायम राहा.

वेळच आली तर तुमचं सामर्थ्य दाखवून द्या. चार पावलं थांबतील ते.कवी माधव पवार म्हणतात त्याप्रमाणे, हम तो दोस्ती तो क्या दुश्मनी भी औकात देखकर करते है । हे तुमच्या वर्तनातून दाखवा. कुणाच्या कसल्याही त्रासाचा त्रास करून न घेणं हा सुखी जीवनाचा पाया आहे. तो पक्का प्रत्येक प्रामाणिक माणसांनी करावा. प्रत्येकाने एकदा हा प्रयोग आपल्या कार्यक्षेत्रात करून पाहावा. नक्कीच आत्मविश्वास वाढेल. निर्भय बना, हुंकाराचा आवाज चढवून तर पाहा. समोरचा कमी होईल? वाढलाच तर भीक घालू नकाच. मनुष्य जन्म एकदाच आहे तर भयभीत होऊ नका. इतरांचा आदर, मानसन्मान, कौतुक, सुख-दु:ख पाहताना तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे भले तरी देऊ कासेची लंगोटी असे जरूर वागू या.-रवींद्र  देशमुख(लेखक हे शिक्षक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcollegeमहाविद्यालयBus Driverबसचालक