पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, ईश्वर-वठार, सुस्ते, गुरसाळे, पखालपूर, करकंब या गावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठून चिखल झाला. तसेच द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, पपई, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेदाणे करण्यासाठी ठेवलेले शेड भिजल्याने बेदाणा खराब झाला आहे. द्राक्षांच्या बागांसाठी उभे करण्यात आलेले लोखंडी बार वाकले व पडले आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पंढरपूर सुस्ते मार्गावरील अनेक झाडे वादळी वाऱ्यामुळे पडली आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक तास बंद झाली होती.
काढणीस आलेली बाग डोळ्यादेखत भुईसपाट
सध्या कोरोनाचे संकट सर्वांवर आहे. या संकटातून सावरत रात्रंदिवस कष्ट करून द्राक्षाची बाग उभी केली होती. पुढील काही दिवसात कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ शकते. या भीतीने कमी किमतीत द्राक्ष माल विक्री केली होती. या द्राक्षांची मंगळवारी तोडणी होणार होती. परंतु सोमवारी रात्री अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्षांची झाडे भुईसपाट झाली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न पडला असल्याचे सांगताना ईश्वर वठार येथील शेतकरी आप्पासाहेब बबन नागटिळक, शिवाजी हळणवार यांचे अश्रू अनावर झाले.
कोट ::::::::::::::::::::
ईश्वर वठार परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- प्रा. सुभाष माने, झेडपी सदस्य
फोटो : आजच तोडणी होणार होती. मात्र, अवकाळी पाऊस पडला. यामुळे द्राक्षांची झाडे पूर्णपणे झोपली, असे रडत सांगताना शेतकरी नागटिळक.( छाया : सचिन कांबळे)
फोटो :::::::::::::::::::::::::
ईश्वर वठार येथे झालेला अवकाळी पाऊस व वादळामुळे द्राक्षाची झाडे कोसळल्याचे दिसत आहेत. (छाया : सचिन कांबळे)
फोटो ::::::::::::::::::::
ईश्वर वठार येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. (छाया : सचिन कांबळे)