शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

उद्यापासून नवरात्रोत्सव; देवी मंदिरात रंगरंगोटी, मंडपाचीही उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:25 PM

नवरात्रीची तयारी : भवानी मातेच्या आराधनेसाठी सोलापूरकर झाले सज्ज

ठळक मुद्देशारदीय नवरात्रोत्सव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणार या नऊ दिवसात देवीमातेची पूजा केली जातेदेवीच्या नऊ रूपांची उपासनाही या काळात केली जाते

सोलापूर : गणपती बाप्पाला नुकताच निरोप देण्यात आला़ आता देवीच्या आगमनासाठी राज्यासह सोलापूरकर सज्ज झाले आहेत़ नवरात्रीची तयारीही भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात येत आहे़ बहुसंख्य मंदिरांमधील रंगरंगोटीचे काम पूर्णत्त्वास आले आहे.  शिवाय सार्वजनिक नवरात्र मंडळांनी चौकातील आपल्या पारंपरिक जागेवर मंडपांची उभारणी केल्याचेही दिसून आले.

शारदीय नवरात्रोत्सव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या नऊ दिवसात देवीमातेची पूजा केली जाते. त्यासोबतच देवीच्या नऊ रूपांची उपासनाही या काळात केली जाते. 

शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये पाहणी केली असता मंदिराचे सभागृह, बाहेरील भागाच्या रंगाचे काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. नवरात्र मंडळांनी दोन दिवसापूर्वीच मंडपाची उभारणी केली आहे. काही मंडळांचे मंडपाच्या छतावर पत्रे टाकणे आणि पडदे मारण्याचे काम सुरू केल्याचे निदर्शनास आले. 

सोलापुरातील पहिले देवीचे मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळातही देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ यंदा या मंडळामध्ये नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ या मंंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे रथामध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि देवीची मिरवणूकही रथामधूनच काढण्यात येते.

देवीच्या स्वागतासाठी मंडप उभारण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे़ रोषणाईचे काम सुरू आहे. सोलापुरातील रूपाभवानी मंदिरामध्ये नवरात्र कालावधीमध्ये भक्तांची भरपूर गर्दी असते़ रूपाभवानी मंदिरामधील तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे़ मंदिरात रंग देण्याचे काम पूर्ण झाले आहे़ आज देवीच्या चांदीच्या चौथºयाला चकाकी देण्यात येणार आहे, तर माणिक चौक व्यापारी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदा मंडप सजवण्याचे काम सुरू आहे़ यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत़ 

आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव हे सोलापुरातील सर्वात जुने मंडळ म्हणून ओळखले जाते़ सोबतच सर्व जाती-धर्मातील लोक येऊन या देवीची पूजा करत असतात़ या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या वर्गणीसाठी फक्त एकच व्यक्ती असते़ तेच सर्वांकडून वर्गणी गोळा करतात. याचबरोबर यंदा नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ - प्रशांत कणसे,सचिव, आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळ

यंदा भक्तांसाठी मंडप - नवरात्रीच्या कालावधीमध्ये रूपाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे दोनपासूनच रांगा लागलेल्या असतात. पण या काळामध्ये पावसाने जर हजेरी लावली तर भक्तांना मात्र भिजतच दर्शन घ्यावे लागते़ यामुळे यंदा मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे़ त्यावर ताडपत्री मारण्यात आली आहे़ यामुळे भक्तांना पाऊस लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे़ याचबरोबर दर्शन रांगांसाठी बॅरिकेड्सही लावले आहेत. देवीच्या आभूषणांना चकाकी देण्यासोबतच गाभाराही रंगविण्यात आला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्री