विरोधात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : केंद्र शासनाने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात बार्शी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर आणि निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुकाध्यक्षा ॲड. सुप्रिया ताई गुंडपाटील म्हणाल्या, काँग्रेस सत्तेत असताना ५० रुपये भाववाढ झाल्याने त्यावेळी रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती इराणी आता गेल्या कुठं ? असा सवालही त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांचे निवेदन तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी भालेराव यांनी स्वीकारले. यावेळी रेखाताई तुपे, दैवशाला जाधवर, शामल काशीद, साखरबाई चौधरी उपस्थित होते.