मोडनिंब : पेट्रोल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात मोडनिंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास तोडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.
याप्रसंगी मोडनिंबचे सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच दत्ता बापू सुर्वे, चंद्रकांत गिड्डे, चांगदेव वरवडे, माजी सरपंच एन.जी. ओहोळ, संतोष पाटील, अमित कोळी, किरण खडके, अतुल गाडे, सोमनाथ माळी, राहुल पाटील, सदाशिव पाटोळे, अशोक भांगे, बालाजी वाघमारे, आनंद गायकवाड, प्रमोद गाडे, डॉ. मारुती सुर्वे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल गिड्डे, राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्ष ऋतुजा सुर्वे, रविकांत सुर्वे, मयुरी शिंदे, आविदा खरे, आरूषी आहोळ, लखन पाटील, अमोल काटकर, सोमनाथ व्यवहारे, शंकर जाधव उपस्थित होते.