एक वर्ष झाले उद्योगधंदे बंद आहेत, लोकांना रोजगार नाही आणि मोदी सरकार रोजच पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवतेय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गरीब शेतकऱ्यांचा आक्रोश बहिऱ्या सरकारला ऐकवण्यासाठी हे आंदोलन केले. भाववाढ कमी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ, बार्शी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, वैराग सरपंच संगमेश्वर डोळसे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्बास कादरी, वैराग अध्यक्ष प्रशांत भालशंकर, महिला तालुकाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, महिला जिल्हा उपाध्यक्ष शलाकाताई मरोड, युवक शहर अध्यक्ष असिफ शेख, सरचिटणीस राजशेखर गुंड, उमेश नेवाळे, विध्यार्थी अध्यक्ष सुरज वालवडकर, बंडूपंत सातपुते, आतिष गायकवाड, सागर गायकवाड, अमर पाटील, शिवम थोरात, भरत काकडे, विश्वजित देशमुख, बाबा शेख, रफिक बेग उपस्थित होते.
----