आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि २६ : व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. टेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, माढा तालुक्यात एकाच घरात दोन गट असून चित भी आपली व पट पण आपलीच, अशी स्थिती आहे. तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी भाजपचा आमदार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजे. भाजपचा उद्देश केवळ सत्ता भोगणे नसून सत्तेचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देणे हा आहे. पूर्वी जिल्ह्यात सात ते आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या, परंतु सामान्य माणसाला काय मिळाले? सत्तेचा वापर स्वत:च्या कुटुंबासाठी केला, जनतेसाठी नाही. बँका कर्ज देण्यासाठी सहकार्य करत नसतील, सोसायट्यांचे सदस्य करून घेतले जात नसेल तर तक्रार करा, असा सल्ला देशमुख यांनी दिला.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. केंद्र शासनाने २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याची घोषणा केली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकत २०१९ पर्यंतच बेघरांना हक्काचे घर देण्याचे ठरवले आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. भाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य आहेत, यामागे निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळ आहे, म्हणूनच पक्ष वाढला आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा संघटक राजकुमार पाटील, अनिल पाटील, बबन केचे यांचीही भाषणे झाली. -----------------------संजय शिंदे भाजपच्या दारातसंजय शिंदे हे भाजपाच्या दारात उभे असून त्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. मी बाजार समितीचा थकबाकीदार आहे का नाही, याची प्रथम चौकशी करावी. गाळ्यांमध्ये मिंधे नाही. मग गाळ्यांचा नफा कोणी खाल्ला? बैठकीला न जाता उपस्थित भत्ता कोणी घेतला, हे सांगावे. मी जिथे जाईल तिथे चांगले दिवस आले आहेत. २५ वर्षांत राजकीय व आर्थिकदृष्ट्या कार्यकर्ते उभे केल्याचे उदाहरण दाखवावे. माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावे. शिंदे घराण्याने आत्तापर्यंत सर्वांना फसविण्याचे काम केले आहे, असा कोकाटे यांनी आरोप केला.
माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:47 AM
व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
ठळक मुद्देटेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळावामाजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावेभाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य