राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:11 PM2019-04-08T12:11:47+5:302019-04-08T12:16:46+5:30

आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

NCP's Rs 70,000 crore horror scandal has come to me: Ranjeet Singh Naik Nimbalkar | राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

Next
ठळक मुद्देज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे - डॉ. दिलीप येळगावकर आता जिहे-कटापूरचं पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे - अनिल देसाई

सोलापूर/ दहिवडी :  राष्ट्रवादीने केलेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडं आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवायचंय की या लबाडांना मतदान करायचंय की नाही असे आवाहन माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केले.
मलवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, विजयकुमार साखरे, डॉ. उज्ज्वलकुमार काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले ,  ज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे. अनिल देसाई म्हणाले, आता जिहे-कटापूरचं पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे. सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप भोसले यांनी आभार मानले.

बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही...
- बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. आपल्या भाषणात रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: NCP's Rs 70,000 crore horror scandal has come to me: Ranjeet Singh Naik Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.