नरखेड : मोहोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या नरखेड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलने सर्व पक्षीय (राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस,) ग्रामविकास परिवर्तन आघाडीचा धुव्वा उडवून पुन्हा सत्ता काबीज केली आहे.
नरखेड ग्रामपंचायत ११ जागांपैकी १० आणि बिनविरोध झालेल्या २ जागा अशा एकूण १३ जागांपैकी १२ जागा जिंकून पुन्हा नरखेड ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये नोटाला ४३४ मते मिळाली. नोटानंतर २ नंबरवर मते मिळालेल्या शिवसेनेच्या सविता हरिभाऊ खंदारे यांना १६३ मते मिळाल्याने निवडणूक आयोगाने त्यांना विजयी घोषित केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, संतोष पाटील, प्रमोद गरड, जयवंत पाटील, चेतन पाटील, शुक्राचार्य कोल्हाळ, विनोद पाटील, प्रदीप पाटील, सुनील भडंगे, डॉ. सुरेश मोटे, अशोक धोत्रे, धर्मराज जाधव, लक्ष्मण राऊत, रमेश मोटे, अरुण यादव, ज्ञानेश्वर ताकमोगे, भारत पाटील, राहुल कसबे, सूर्यभान गोडसे, संतोष मोटे, दाजी रणपिसे, शिवाजी शिंदे, अर्जुन खंदारे, राहुल पाटील, बाळासाहेब मोटे ग्रामस्थ उपस्थित होते.
---
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग १ : यशवंत दिगंबर मोटे, संतोष कोळेकर.
प्रभाग २ : हनुमंत राऊत, सुवर्णा जाधव.
प्रभाग ३ : विद्या मोटे, सुवर्णा सुतार.
प्रभाग ४ : सुहास गरड, रेखा राऊत.
प्रभाग ५: सचिन शिंदे.
अकबर इनामदार. यापूर्वी बिनविरोध २ महिला
उमेदवार. प्रभाग ४ : सविता धोत्रे. प्रभाग १ : वैशाली बनसोडे. प्रभाग ५ : नोटानंतर उमेदवार विजयी, सविता खंदारे. निकालानंतर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटीलसह विजयी उमेदवार.
---
फोटो : २० नरखेड
उमेश पाटील विजयी उमेदवारांसह जल्लोष साजरा करताना.