सोलापूर : कोरोनामुळे मरण पावलेल्या किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आणखी ३४ लोकांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आणखी ४५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यांची माहिती सायंकाळी जाहीर होणार आहे.
किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या १४८ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. ९१ जणांचे मंगळवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाले होते. यात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी आणखी ३४ लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.
कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील काही अहवाल बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी प्राप्त होणार आहेत.