वार्षिक अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण या दोन्ही बैठकीला चक्क नगराध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. या दोन्ही बैठका शहराच्या विकासाच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाच्या होत्या. या उलट बागल गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित राहत अनेक सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी सत्ताधारी गटाला
नगराध्यक्ष या नात्याने सर्वसाधारण सभा आणि वार्षिक अर्थसंकल्प मिटिंग या दोन्ही बैठकांसाठी त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यामध्ये आरोग्य विषय कामाचा ठेका, पाणीपुरवठा प्रश्न, दिवाबत्ती कामे, भाजीमडंई निविदा, सामान्य प्रशासन, शहरातील रस्ते विकासकामे आदी महत्त्वाचे विषय असताना नगराध्यक्ष उपस्थित राहत नसतील तर ही बाब गंभीर असल्याचा आरोप बागल गटाच्या नगरसेवकांनी केला आहे.
यावेळी नगरपालिकेचे बागल गटाचे गट नेते शौकत नालबंद, विरोधी गटनेते श्रीनिवास कांबळे, डाॅ. अविनाश घोलप, अल्ताफ तांबोळी, सचिन घोलप, राजश्री माने, प्रमिला कांबळे, संगिता खाटेर उपस्थित होते.
दिशाहिन आरोप.. जनतेचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न
करमाळा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात करमाळा नगर परिषदेला आम्ही मोठे यश मिळवून देत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्यावेळी शहर विकासाच्या बाता करणारे बागल गटाचे नगरसेवक कुठे होते? ते या शहराची मान उंचावणाऱ्या लढाईत आमच्यासोबत का उतरले नाहीत? शहरविकासाकडे नगराध्यक्षांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असे दिशाहीन करून जनतचे मन आपल्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे.
----