पंढरपूर (जि़ सोलापूर) : विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूला नंतरच्या काळात झालेल्या चुकीच्या बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. ही बांधकामे हटवून गाभाऱ्यातही बदल केल्यानंतर मंदिर आणि विठ्ठल मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक विलास वहाणे यांनी केला़वहाणे आणि त्यांच्या पथकाने रविवारी मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अस्ताव्यस्त बांधकामे यामुळे छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर पडत आहे़ त्यामुळे आता संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार आहे. त्यानंतर नेमके काय बदल करावे लागतील, याचा अहवाल मंदिर समितीपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराचे दगडी खांब तुटले आहे. मूळ मंदिरातील पुरातन दगड काही ठिकाणी निसटू लागले असून, काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगादेखील पडू लागल्या आहेत.>मूळ वास्तूच्या रचनेलाच धोका११ व्या शतकात मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते. मात्र नंतरच्या काळात विठ्ठल मंदिराचा विस्तारवाढत गेला. गाभाºयात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरूप सुधारणाच्या नावाखाली झाकून टाकले आहे़ आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल, असे विलास वहाणे यांनी सांगितले.
नव्या बांधकामाने विठ्ठल मंदिराला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:28 AM