सोलापूर : शहरात गाड्या घेऊन बाहेर पडायचे म्हणजे सर्वांत पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे गाडी पार्किंग कुठे करायची़ कारण जागा असते कमी़ पार्किंग करण्यासाठी गाड्यांची रांग लागलेली असते़ पण हा प्रश्न सुटण्यासाठी ए़ जी़ पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जागेवर सर्व बाजूंनी गाडी फिरणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानामुळे आॅटोमोबाईल क्षेत्रात विविध बदल होत आहेत. सध्या पार्किंगसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी गाडी जागच्या जागी फिरावी यासाठी हा प्रयोग केला आहे. जसे बुलडोझर स्टेअरिंग जागच्या जागी फिरू शकते़. बुलडोझरचा वरील भाग केबिन आणि खालचा भाग क्रॉलर चेन, वरील भाग खोदणारा त्याचा केंद्रबिंदू फिरवू शकतो, अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे़ या प्रकल्पात पुढील व मागील चाके सिस्टीमशी जोडलेली असतात़ त्यांच्याशी संलग्न असलेल्या यंत्रणेमुळे दोन गाड्यांमधील जागेत गाडी पार्किंग करता येते.
हा प्रयोग प्रा.बी. डी. अन्डगी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहा जोडमोटे, संतोष सुतार, विनय चलगेरी आणि बोमेन वरदराज यांनी यशस्वीपणे पूर्ण केला़ संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस .ए. पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.ए.चौगुले, प्राचार्य डॉ.एस.ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, डॉ. एस .बी. गडवाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले़