शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आधुनिक शिक्षणातील नवा प्रवाह...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:17 AM

काळाच्या ओघात बदल होत राहणे,  सृष्टीचा नियम आहे. या बदलातूनच विकासाचे टप्पे आणि दिशा ठरतात. जागतिकीकरणाच्या काळात जगातील प्रत्येक ...

ठळक मुद्दे२०१२ पासून या प्रणालीला कोट्यवधी विद्यार्थ्यांनी भारतातूनदेखील प्रतिसादसाहित्यासह दृकश्राव्य आदी माध्यमातून विविध संकल्पनांची मांडणी केलीउच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांच्या अनुभवी प्राध्यापकांसोबत साहजिकच विद्यार्थी जोडला

काळाच्या ओघात बदल होत राहणे,  सृष्टीचा नियम आहे. या बदलातूनच विकासाचे टप्पे आणि दिशा ठरतात. जागतिकीकरणाच्या काळात जगातील प्रत्येक क्षेत्र आणि देश विविध स्वरुपाच्या बदलांना स्वत:हून सामोरे गेले आहेत; तर आवश्यकता म्हणूनदेखील हे बदल स्वीकारले आहेत. शिक्षणाला सुसंस्कृत समाजरचनेचा पाया मानला जातो. शिक्षण जगातील मानवजातीच्या उत्थानाचे साधन मानल्याने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा मुद्दा गांभीर्याने घेतला जातो.

कारण, शिक्षणाचे जेवढे जास्त सामाजिक अभिसरण होईल तेवढ्या जास्त वेगाने समाजाचा विकास होईल. भारतात अलीकडील काळात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झपाट्याने होत असल्याचे दिसून येते; लिहिता- वाचता येण्यापुरत्या साक्षरतेचे स्थान संगणक साक्षरतेने घेतल्यामुळे ही संकल्पना परवलीची बनली आहे.

भारताचा लोकसंख्येच्या प्रमाणात जगात वरचा क्रमांक लागतो; त्यात भर म्हणजे भारतीय लोकसंख्येच्या वयोमानाची तुलना जगाच्या वयोमानाशी केली; तर भारत तरुणांचा देश असल्याचे जगाने कबूल केले आहे. जगातील सर्वाधिक तरुण भारतात असल्याने विकासाचा वेग झपाट्याने वाढेल या आशेने जग भारताकडे बघत आहे; तथापि, जर राज्यकर्ते या तरुण लोकसंख्येला योग्य शिक्षण, संस्कार आणि रोजगार देण्यास असमर्थ ठरले तर या तरुण पिढीस विधायक कार्यात गुंतवून ठेवणे अवघड होईल, अशी भीतीदेखील व्यक्त केली जाते.  

विधायक विचार, संस्कार आणि शिक्षणास समानार्थी विचाराने सृजनशीलता व उद्यमतेच्या अंगाने पाहिले जाते;  स्वप्रकटीकरणाबरोबरच व्यवसाय, नोकरीद्वारे जीवनाच्या व पर्यायाने समाजाच्या स्थिरतेच्या व भरभराटीच्या अंगानेदेखील शिक्षणाला महत्त्व आहे. याच उद्देशाने प्रत्येक देशाने शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल, विचार आणि प्रणालींना आत्मसात केले आहे.

एकीकडे विज्ञान आणि  तंत्रज्ञानाने प्रगती केली; तशी, जगभर शिक्षणातील एका नव्या व वेगळ्या संकल्पनेने २००८ सालापासून वादळ उठविले. सगळीकडे ‘मॅसिव्ह ओपन आॅनलाईन कोर्सेस’  टडडउ या संकल्पनेने जोर धरला.  आॅनलाईन पद्धतीने वेबसाईट आधारित कोर्सेसचे प्रचंड मोठे प्लॅटफॉर्म जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘टडडउ’ च्या माध्यमातून खुले झाले. आपल्या आजूबाजूच्या उच्च दर्जा असलेल्या शिक्षण संस्थेची अथवा जगातील दर्जेदार संस्थेची पदवी आपल्याकडे असावी, असे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. टडडउच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ही स्वप्ने पूर्ण होताना दिसत आहेत.

२०१२ पासून या प्रणालीला कोट्यवधी विद्यार्थ्यांनी भारतातूनदेखील प्रतिसाद दिला. त्यामुळेच आजमितीस टडडउ हा प्लॅटफॉर्म अधिक प्रचलित होत आहे़ मागणीच शिक्षणाचे साधन बनले आहे. या प्लॅटफॉर्मवर सर्व शाखांचे कोर्सेस अत्याधुनिक  शिकविले जातात. संबंधित विषयाच्या साहित्यासह दृकश्राव्य आदी माध्यमातून विविध संकल्पनांची मांडणी केली जाते; या माध्यमातून उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांच्या अनुभवी प्राध्यापकांसोबत साहजिकच विद्यार्थी जोडला जातो. 

हे कोर्सेस कसे चालतात ?‘टडडउ’ कोर्सेसच्या माध्यमातून एक वेब आधारित जागतिक प्लॅटफॉर्म तयार केला जातो; या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी व शिक्षक एकत्र येतात. विविध प्रकारच्या कोर्सेसमधून विद्यार्थी  त्याला  आवश्यक असलेला  कोर्स निवडतो. साहजिकच, याद्वारे आॅनलाईन साधनांचा पूल तयार होतो. ही संसाधने  विद्यार्थी त्याच्या सोयीने  अभ्यासतो. वाचणे, पाहणे,  विचार व चिकित्सा, नवीन गोष्टींचा शोध घेणे असे  शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आपोआप या प्रक्रियेत घडत जातात. विद्यार्थी अनुभवी शिक्षकांच्या नोट्स मिळवितात, स्वत:च्या नोट्स व स्वनिर्मित संसाधने इतरांसाठी अपलोड करतात; तसेच सहकाºयांशी संसाधनांची देवाणघेवाणदेखील करतात. अलीकडील काळात टडडउ कोर्सेसचे सार्वत्रिकीकरण होताना दिसत आहे. कारण, खासगी क्षेत्रासोबतच विद्यापीठ अनुदान  आयोगानेदेखील भारत  सरकारच्या  मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मदतीने भारतातील शिक्षण प्रक्रियेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी टडडउ कोर्सेसची निर्मिती  केली.

सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिकतेची जोड असलेल्या कोर्सचा यामध्ये समावेश केला गेला आहे. काही कोर्सेस कुठलेही शुल्क न घेता तर काही सशुल्क स्वरूपात शिकविले जातात. यामुळेच अलीकडील काळात, रहअअट हे नाव विद्यार्थ्यांमध्ये सतत चर्चेत राहिले आहे; रहअअट म्हणजेच स्टडी वेब्स आॅफ अ‍ॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स.  त्याच सोबत, तंत्रज्ञानाधारित कोर्सेस भारतात ठढळएछ च्या माध्यमातून  इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सद्वारे  चालविले जातात. - डॉ. दीपक ननवरे (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत़)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालय