सोलापूर : कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा विचार करण्याबरोबर मॅचिंगचा मास्क घालण्याची फॅशन महिलांमध्ये फॅशन स्टेटस बनत चालला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मास्कच्या नवं नवीन व्हरायटी पाहायला मिळत आहे. मॅचिंग मास्क हा ट्रेंड महिलांसोबतच पुरुषवर्गातही मोठ्या प्रमाणात फॉलो केला जातोय.
साडी, कुर्ता, ब्लाऊजला, ओढणीला मॅच होणारा मास्कचा वापर करताना सध्या दिसत आहेत. मास्क लावल्यानंतर चेहरा अर्धा झाकला जातो त्यामुळे पहिले लक्ष हे कपडे यापेक्षाही चेहºयावरील मास्ककडे जाते त्यामुळे नवनवीन डिजाईनचे मास्क वापण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे. विशेषत: लग्नसमारंभात नवरा- नावरीसाठी त्यांच्या पेहरावानुसार नवरीच्या पैठणी आणि मुलांच्या सदºयाला मॅच होणारा मास्क घालण्याचा फॅशन ट्रेंड पाहावयास मिळतोय.
महिलांमध्ये रंगीबिरंगी डिझाईन पैठणी पासून बनवलेले मास्क सध्या मार्केट मध्ये आकर्षण ठरत आहे. पूर्वी साडी घेताना महिला फक्त मॅचिंग ब्लाऊज घेत होत्या मात्र सध्या अनेक महिला साडी घेतेवेळेस साडी आणि ब्लाउज सोबतच मास्कची खरेदी देखील करत आहेत. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये साडीवर मॅचिंग असा मास्क देखील उपलब्ध करून दिला जात आहे. सध्या बाजारात विविध कपड्यापासून आणि नक्षीदार काम केलेले मास्क देखील बाजारात उपलबध आहेत.
आहेरात आता मास्कचा समावेश...टोपी, टॉवेल आहेर करण्याची पद्धत देखील बदलली असून पूर्वी लग्नसमारंभ आणि कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना आहेर म्हणून टोपी, टॉवेल देण्यात येत असे आता मात्र कोरोनाकाळामुळे नागरीकांत टॉवेल अन टोपीसोबतच मास्कही दिला जात आहे. तर ओटी भरताना भेट म्हणून मास्क आणि अक्षतांबरोबर मास्क देण्यात येत आहे त्यामुळे नवा ट्रेंड सुरु होताना दिसत आहे.
सध्या कोरोनामुळे मानवाच्या अनेक सवयी बदलत आहेत त्यानुसार महिलांमध्ये साडीसोबत मॅचिंग मास्कची मागणी वाढली आहे. नव्या ट्रेंडनुसार आम्ही ग्राहकांना साडीवर मॅचिंग मास्क देत आहोत. - लक्ष्मीकांत चाटला, व्यापारी