सोलापूर : श्री सिध्देश्वर मंदिराच्या परिसरातील संमती कट्ट्याच्या परिसरात एक महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक काळ्या कापडात गुंडाळलेल्या आवस्थेत बुधवारी सकाळी आढळलं. ही माहिती कळताच चाईल्ड लाईन व पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथून पुढील उपचारासाठी त्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी नागरिक हे सिध्देश्वर मंदिर परिसरातील रस्त्यालगत वॉकिंग करताना नागरिकांचा झाडातून आवाज येत होता.
एका नागरिकाने जवळ जाऊन पाहिल्यानंतर तेथे बाळ त्यांना दिसलं. हे पाहताच काय कराव हे त्यांना सूचेनास झाले. दरम्यान त्यांनी लगेच याची माहिती चाईल्ड लाईन वर संपर्क साधून दिली. माहिती मिळताच संस्थेच्या संगीता पारशेट्टी व त्यांचे सहकारी योगेश स्वामी हे तेथे आले. त्या मुलीला आपल्या ताब्यात घेत त्यांनी याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना दिली. पोलिस ही लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी त्या मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"