अकलूज येथील महावीर भालेराव व लता भालेराव यांचे पुत्र अभिषेक, सून पूजा यांना दसऱ्यापूर्वी कन्यारत्न झाले होते. मुलीचा जन्म झाल्यावर भालेराव कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. त्यानंतर कन्यारत्नाच्या स्वागतासाठी आतुरलेल्या भालेराव कुटुंबाने घराला मांगल्याचे प्रतीक असलेली केेेेळीचे खुंंटे लावून फुुले व फुग्यांंनी सजावट करीत स्वागताची जय्यत तयारी केली. माहेराहून कन्यारत्नासह पूजा भालेराव अकलूज येथे येताच माय-लेकीचे जोरदार स्वागत करताना फुला-रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या, तसेच दोघींना घोड्यावर बसवून ढोल-ताशाच्या तालावर वाजत-गाजत दोघींचेही औक्षण करून स्वागत केले. हा अनोखा कौतुकाचा स्वागत सोहळा पाहताना शेजारील कुुुटुुंबे भारावुून गेली. भालेराव कुटुंबाने मायलेकीचे उत्साहात स्वागत करत मुलगा-मुलगी समान असून, स्त्री जन्माचे स्वागत करा, असा सामाजिक संंदेश दिला आहे. याप्रसंगी जमलेल्या आप्तेष्ट, मित्रमंडळी व नातेवाइकांना भालेराव कुटुंबाच्यावतीने मिष्टान्न भोजन देऊन आनंदोत्सव साजरा केला.
फोटो लाईन
०२पंड०४
अकलूज येथील भालेराव कुटुंबाने कन्यारत्नाचे स्वागत करताना घोड्यावरून अशी माय-लेकीची मिरवणूक काढली. (छाया : राजीव लोहकरे)