सोलापूर : राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दि.२२ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाला ठेंगा दाखवित यावेळेत शहरातील नागरिक खुलेआम फिरताना दिसून आले, तर काही ठिकाणीं रात्री उशिरापर्यंत गटागटाने गप्पा मारत उभे असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे सोलापुरात संचारबंदी आहे की नाही ? हाच प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.
शहरातील काही मोजक्याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या दिसत होती. काहीजण कामानिमित्त बाहेर पडल्याचे सांगत होते, तर काहीजण आपापल्यापरीने क्षुल्लक कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले , त्यामुळे संचारबंदीस सकारात्मक प्रतिसाद देत घराबाहेर न पडणारे आणि खुलेआम फिरणारे असे दोन गट पहावयास मिळाले .
01) छत्रपती शिवाजीचौक बाहेरून शहरात येणारी वाहने मोठ्या प्रमाणात या चौकातून ये-जा करीत होती. मध्ये दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी वाहतूक करणारे बसेस होते. ठिकाणी बंदोबस्तास असलेले एकच पोलीस शिपाई थंडीमुळे एका कोपऱ्यात बसून होते. शहरातील अत्यंत गजबजलेल्या ह्या चौकात संचारबंदीत ही वाहनांची गर्दी होती.
02 ) विजापूर वेस येथील येथील मुख्य चौकात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोरच गप्पा मारत उभे असलेले नागरिक दिसून आले. चौक ते बेगम पेठ रस्त्यावर बोळाबोळात नागरिक गटागटाने गप्पा मारत उभे होते. कडून जोडबसवण्णा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती.
03 )बसस्थानक पहाटेचे सव्वाएक वाजलेले काही परगावहून आलेले प्रवासी आपल्या बॅगासह वाहनांच्या शोधात परिसरात फिरताना दिसून येत होते. संचारबंदीबाबत अनभिज्ञ असलेल्या बहुतेक प्रवाशांनी आपल्या घरी चालत जाताना दिसून आले, तर काही प्रवासी सकाळपर्यंत तिथेच राहणे पसंत केले.
04) रेल्वे स्टेशन कोविडच्या संकटामुळे पूर्ण क्षमतेने रेल्वे गाड्या सुरू नसल्या तरी काही मोजक्याच गाड्या सुरू आहेत. दीड वाजण्याच्या सुमारास या परिसरात शुकशुकाट होता, पण स्टेशनच्या बाहेरील बाजूस ३०-४० प्रवासी आपल्या बॅगा डोक्याखाली घेऊन झोपी गेली होती. साधला असता त्यांनी सोलापुरात आल्यावर रात्रीची संचारबंदी असल्याचे समजले, कोणत्याच वाहनांची सुविधा होत नसल्याने आम्ही इथेच झोपण्याचे ठरवले असून, सकाळीच घरी जाणार असल्याचे सांगितले.
--------------
संचारबंदीकाळात शहरात सात रस्ता, मार्केट यार्ड आणि जुना पुना नाका परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळेत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होते. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. जोडबसवण्णा चौक चारचाकी वाहनधारकांची रेलचेल मार्केट यार्डात भाजीपाला आणि कृषी माल घेऊन येणाऱ्या गाड्यांची रेलचेल होती. जिल्हा परिषद पूनम गेट .. रात्री ११.५- सिद्धेश्वर प्रशाला ते पूनम गेट रस्ता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते रात्री ११ वाजता सुरू झालेले काम पहाटे ६ वाजेपर्यंत चालू होते, खडी आणण्यासाठी टिपर रात्रभर मधला मारुती रस्त्यावरून तुळजापूर नाक्याकडे ये-जा करत होते. मार्केट यार्ड चौक. पहाटे चे दोन वाजलेले ....
संचारबंदीतही शहरातील सर्वांत जास्त वर्दळ या ठिकाणी होती, हैदराबाद आणि पुणे, मुंबईहून येणाऱ्या माल ट्रक, लक्सरी बस आणि मार्केट यार्डमध्ये येणारी कृषी मालाची वाहने यामुळे चौक गजबजून गेला होता, पोलीस शहरात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करीत होते.