यावेळी पोथरे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समन्वय समितीच्या वतीने सरपंच धनंजय पाटील, पोलीस पाटील संदीप शिंदे, ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ दरवडे यांनी नऊ दिवस एकजुटीने कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले.
सध्या पोथरेसह वाड्यावस्तीवर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या काळात केवळ वैद्यकीय सेवासुविधांबाबत मुभा असेल. दरम्यान गावातील किराणा दुकानेही बंद राहणार असून छुप्या मार्गाने साहित्य देवाणघेवाण झाल्यास पाच हजार रुपये दंडासह तीस दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात येईल. तसेच विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठरले.
पोथरे येथे संचारबंदी दरम्यान नागरिकांनी आवश्यक साहित्याचे दोन दिवसात नियोजन करुन ठेवावे. बंद काळात घराबाहेर पडून कोरोना लढाईत बाधा आणत स्वतःसह कुटुंबाला, ग्रामस्थांना त्रास होईल असे वर्तन करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अवाहन पोलीस पाटील संदीप पाटील व ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ दरवडे यांनी केले आहे.