मागील वर्षी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याची शासन स्तरावरून दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून पीकनिहाय नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम शासन स्तरावरून करण्यात आले. परंतु गुरसाळे, नेमतवाडी आणि पेहे या तीन गावांसाठी एकच तलाठी आहे.
तलाठ्यांच्या बेभरोसे कारभारामुळे तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरसाळे येथील ३७ शेतकऱ्यांचे ३ लाख ४५ हजार २५०, नेमतवाडी येथील ११ शेतकऱ्यांचे १ लाख ७ हजार ७५० तर पेहे येथील ३३ शेतकऱ्यांचे ४ लाख ७१ हजार ३०० रुपये तहसील कार्यालयात पडून आहेत. यामुळे संबंधित शेतकरी तब्बल १० महिन्यांपासून नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत.
कोट ::::::::::::
तीन गावांपैकी नेमतवाडी येथील १ शेतकरी खाते क्रमांक नसल्याने आणि गुरसाळे येथील १६ शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे नुकसानभरपाई मिळण्यास अडचण आहे. अन्यथा उर्वरित शेतकऱ्यांना ८ दिवसांत नुकसानभरपाई मिळेल.
- सुशील तपसे,
तलाठी