शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्हा परिषदेच्या नेहरू शासकीय वसतीगृहात मागील चार दिवसापासून पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांनी आंघोळ केली नाही. शेवटी संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार 17 एप्रिल रोजी बादली घेऊन जिल्हा परिषदेत आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.
नेहरू वसतिगृह ते जिल्हा परिषदमधील अंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत कापले. विद्यार्थ्यांनी बादली, टॉवेल, झाडू घेत आंदोलनात सहभाग घेतला. बनियन, टॉवेल आदी कपड्यावर जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला. प्रशासनाने पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास जिल्हा परिषदेसमोर अंघोळ करणार असल्याचे विद्यार्थांनी सांगितले.
विद्यार्थी 3 हजार 700 रुपये वसतिगृहाचे शुल्क भरतात. मात्र, त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. परीक्षेच्या काळात आंदोलन करावे लागत आहे. 41 अंश सेल्सिअस तापमानात आंघोळ न करता कसा अभ्यास करायचा असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"