सोलापूर : मागील काही दिवसांपासून वाढत चाललेली कोरोना रूग्णांची संख्या आता हळूहळू कमी कमी होत आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आला नाही. सोलापूर शहराची कोरोना रूग्णसंख्या फक्त २२ एवढीच आहे.
दरम्यान, रविवारी २२ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी सर्वांचाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल बरे होऊन गेलेल्या रूग्णाची संख्या एक एवढी असून मयत व्यक्तींची संख्या ० इतकी आहे. सोलापूर शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ३४ हजार ७३९ एवढी असून मृतांची संख्या १ हजार ५१९ एवढी आहे. तर शहरात पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांची संख्या २२ एवढी आहे. आतापर्यंत रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार १९७ एवढी आहे.