सोलापूर: नियंत्रण सुटल्याने फार मोठे नुकसान झाले आहे, शाळांची गुणवत्ता राहिली नाही, दवाखान्यात रुग्ण जात नाहीत, हे वास्तव असल्याचे खुद्द जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीच प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांना सांगितले.उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या दालनात गुळवे व समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांनी गुडेवार यांना जिल्हा परिषदेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी अनेक मुद्दे मांडले. कर्मचारी व शिक्षक संघटनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांची गुणवत्ता तपासण्याची गरज त्यांनी सांगितली. आरोग्य केंद्राची अवस्था कथन करताना त्यांनी दवाखान्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकेही रुग्ण उपचारासाठी येत नाहीत, दवाखान्यात आलेल्याला उपचार होईलच याचा विश्वास नाही. गुडेवार यांनाही जिल्हा परिषदेच्या कारभाराची स्थिती माहीत असल्याने आम्ही मनपात गणवेश घालतो, आरोग्य केंद्राला ३० कर्मचारी असतात, रुग्ण तेवढेही येत नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांचे खरे असल्याचे सांगितले. अध्यक्षांच्या दालनात शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी आम्ही सुरुवातीला प्रयत्न करुन पाहिला परंतु जागेवर कर्मचारीच भेटत नसल्याचे सांगितले. -------------------------------------------------संघटनांचे पेव फुटलेजिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात विशेषत: शिक्षण विभागात संघटनांचे पेव फुटले असल्याचे गुडेवार यांच्या निदर्शनाला आणले. शिक्षकांना ‘ड्रेसकोड’ होता त्यावेळी किमान शिक्षक कोण आहे हे तरी समजत होते. यामुळेच ड्रेसकोडला संघटनेच्या माध्यमातून विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे पूर्वीही पदाधिकारी असायचे परंतु आताचे पदाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगावर जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेत गुणवत्ता, आरोग्य केंद्रात रुग्ण नाहीत !
By admin | Published: June 16, 2014 1:12 AM