अधिक माहिती अशी की, कोर्सेगाव येथील सीना नदीत वाळू उपसा होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पोलिसांनी जाऊन पाहिले असता, अंधाराचा फायदा घेऊन सात वाहनचालक, एक बोटचालक अशी आठ वाहने दिसली. तसेच सागर संजय अभंगराव (वय १९, रा. नांदणी, ता दक्षिण सोलापूर), आकाश माणिक कांबळे (वय २०, रा. बरूर, दक्षिण सोलापूर), महिबूब मुलुख बंदगी (वय २९, रा. इंगळगी, दक्षिण सोलापूर) हे तिघे पोलिसांच्या हाती लागले आहे. शिवाय एमएच १३ एएक्स ३९८५, एमएच १३ एएक्स ३९१४, एमएच १३ सीयु ९०३३ असे प्रत्येकी २२ लाख रुपयांची तीन टिपर, २२ लाख, २८ हजार किमतीचे एमएच सीयू ९६०० आणि ३२ लाखांचा बिगर नंबरचा हायवा टिपर, सात लाख रुपये किमतीचे एमएच १० झेड १२७३ टिपर, तीन लाख किमतीची एक बोट, दोन मोबाइल हॅन्डसीट असे १ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. घटना घडताच दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलिसांनी संपर्क साधला असता सहा.पोलीस निरीक्षक राठोड यांनी काही पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनय बहिरे, पोलीस हवालदार लक्ष्मण हेमाडे, हवालदार कल्याणी भोईटे, हवालदार दत्तात्रय झिरपे यांनी केली.
फोटो१४ अक्कलकोट-क्राईम
ओळी
कोर्सेगाव, ता.अक्कलकोट येथील सीना नदीत अवैधरीत्या वाळू उपसा करण्यासाठी आलेली वाहने.