शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ना शाळा, ना परीक्षा, तरीही सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थी झाले  पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 2:21 PM

ऑनलाईन पद्धतीने झाले शिक्षण : शहरापेक्षा ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी

सोलापूर : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. सुरुवातीला पहिली ते नववी व अकरावी त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील आठ लाख ५७ हजार १५१ विद्यार्थी पास झाले आहेत.

प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने यावर्षीही ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावात नेटवर्कची समस्या आहे, त्याठिकाणी पालक, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. ऑनलाईनमध्ये वेळेची मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे, हे समजणे अवघड आहे. गतवर्षी सहामाहीपर्यंत पाचवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. पहिली ते चौथीपर्यंत मात्र एप्रिलपर्यंत ऑनलाईन अध्यापन सुरू होते. वार्षिक परीक्षा रद्द झाली. मात्र, सहामाही व दोन चाचणी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी तर गुणांचा पाऊसच पाडला शिवाय सरसकट पासचा मात्र सर्व विद्यार्थांना फायदा झाला.

डिसेंबर २०२० मध्ये शासनाने नववी-दहावीच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. परंतु कोरोनामुळे तो फसला. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाची लाट इतकी उसळली की, हजारो लोकांचे जीव गेले. शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची रिस्क घेतली नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही. पण शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

----

वर्गनिहाय विद्यार्थी...

  • पहिली - ७०६०६
  • दुसरी - ७६१६७
  • तिसरी - ७६०९८
  • चौथी - ७७३११
  • पाचवी - ७७१९७
  • सहावी - ७६४२०
  • सातवी - ७६२६७
  • आठवी - ७४६४३
  • नववी - ७६५७६
  • दहावी - ७१०५०
  • अकरावी - ५११२०
  • बारावी - ५३६९६

------------

फायदे

  • कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले.
  • ऑनलाईन शिक्षणाचे फायदे कोरोनाच्या संसर्गात शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकले.
  • ऑनलाईन वर्गात शिक्षकांचा एखादा मुद्दा न समजल्यास, रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यार्थी पुन्हा पाहू शकतो. अभ्यासातील काही गोष्टी समजल्या नाही, तर गुगलवर सोप्या भाषेत शोधू शकतो.

----

तोटे....

  • ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.
  • नेटची सुविधा, अनेक विद्यार्थ्यांकडे पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला नाही.
  • शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ, पेपर देण्यात येत होते. यात अडचणी आल्या. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेने फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही.

----------

  • जिल्हा परिषद शाळा - २७९८
  • अनुदानित शाळा - १०४३
  • विनाअनुदानित शाळा - १५०
  • शहरातील शाळा - ३९०
  • इतर शाळा - ६९३

----

शहरे आणि गाव

ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा सुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक असो की विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये अनेक विद्यार्थी गेल्या सत्रात शिक्षणापासून वंचित होते. शहरामध्ये काही नामांकित शाळेत ऑनलाईन शिक्षण झाले. पण विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या