सोलापूर : सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया नवीपेठेतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी सोमवारपासून नो व्हेईकल झोनच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला़ सोमवारपासून केलेली अंमलबजावणी मंगळवारी म्हणजेच दुसºया दिवशीही सुरूच ठेवण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या या निर्णयामुळे नवीपेठेत कोणत्याही प्रकारचे वाहन आणण्यास बंदी घालण्यात आली होती़ जुनी महानगरपालिका इमारत गेट ते राजवाडे चौक व सुभाष चौक ते बैलगोठा पार्किंगपर्यंतचा रस्ता पूर्णपणे ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला होता़ त्यामुळे सोमवारी दिवसभर नवीपेठने मोकळा श्वास घेतला़ मात्र याचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गांना बसला असून, दिवसभरात म्हणावा तसा व्यवसाय झाला नसल्याची खंत व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सोमवारी सकाळपासून नवीपेठेत नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली़ वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह ५० कर्मचाºयांनी नवीपेठेत मोर्चेबांधणी केली़ बॅरिकेड्स टाकून रस्ते बंद करण्यात आले होते़ तसेच वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले होते़ चौपाड सिटी पोस्ट ते हुतात्मा बाग, फॅशन कॉर्नर ते माने वकील बोळ, सरस्वती चौक ते शिवस्मारक हे चार रस्ते नवीपेठेत येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत़ चौपाड, बाळी वेस, पांजरापोळ चौक या भागातील नागरिकांना दत्त चौकातून अंत्रोळीकर शॉपिंग सेंटरला वळसा घालून हुतात्मा बाग, लकी चौकाकडे जाता येईल तर शिवस्मारकमागील सिंधी शॉपिंग सेंटर ते मेकॅनिक चौकमार्गेही प्रभात टॉकीज स्टेशनकडे वाहन चालकांना जाता येईल़ नवीपेठेत मेकॅनिक चौक आणि नामदेव चिवडा, राजवाडे चौक येथून कोणतेही वाहन आत येण्यास बंदी घालण्यात आली होती.
नवीपेठेने घेतला मोकळा श्वास...- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर नवीपेठेतील काही भाग नो व्हेईकल झोन केला आहे़ याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली़ सकाळी दहा वाजल्यापासून नवीपेठेत जाणारे मुख्य रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते़ शिवाय वाहनांना येण्यासाठी असणारे नवीपेठेतील लहान-मोठे रस्ते पूर्णपणे बंद केले होते़ सोमवारी नवीपेठेत गाड्यांना बंदी घालण्यात आली होती़ यामुळे एकही दुचाकी व चारचाकी वाहन नवीपेठेत सोमवारी दिवसभर दिसले नाही़ त्यामुळे नवीपेठेने बºयाच दिवसांनंतर मोकळा श्वास घेतला़
नवीपेठेत क्रिकेट खेळून व्यक्त केला निषेध...- नवीपेठेत करण्यात आलेल्या नो व्हेईकल झोनला विरोध दर्शविण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांनी पोलिसांना घेराव घातला़ याचवेळी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाºयांनी नवीपेठेत क्रिकेट खेळून या निर्णयाचा निषेध नोंदविला़ यावेळी शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, भाजपचे नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक आनंद चंदनशिवे, महेश धाराशिवकर, काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते राज सलगर, राष्ट्रवादीचे सुहास कदम आदींनी या निर्णयाला विरोध दर्शविला़ पोलिसांनी लोकप्रतिनिधी, महापालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन या निर्णयातील त्रुटी दूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे़
पोलिसांकडून दिशाभूल व पसरविला जातोय संभ्रम- वास्तविक पाहता पोलीस प्रशासन व नवीपेठ व्यापाºयांच्या झालेल्या बैठकीत नो व्हेईकल झोनबाबत व्यापाºयांनी व नवीपेठ व्यापारी असोसिएशनने मुद्दा उपस्थित केलेला नव्हता़ त्याचबरोबर आपण ज्या पार्किंगच्या जागा नमूद केलेल्या आहे त्या जागांपैकी एकही जागा नवीपेठ व्यापारी असोसिएशनने सुचविलेली नाही़ तरी देखील नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी व्यापारी व नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या सांगण्यावरून झालेली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे़ यामुळे नागरिक, व्यापारी व ग्राहकांत संभ्रम व दिशाभूल करण्याचे काम पोलिसांकडून होत आहे़ यामुळे नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे़
हॉकर्सधारकांना पर्यायी जागा...- नो व्हेईकल झोन निर्णयात हातगाडी चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यात आला नाही़ अधिकृत हातगाडी चालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे़ त्याबाबतची संपूर्ण तयारी, नियोजन सुरू आहे़ हातगाडी चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची संपूर्ण काळजी पोलीस प्रशासन घेत असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले़