शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी

By appasaheb.patil | Published: September 20, 2023 2:25 PM

सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे.

सोलापूर :  भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला. त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून उजनीतून सोडलेले पाणी आज पंढरपुरात पोहोचणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाने दिली. या पाण्यामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर भागातील पाण्याची समस्या तूर्त दोन महिने मिटली आहे.

सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. अशा परिस्थितीत भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना सूचना दिलेल्या आहे. या निर्णयामुळे भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर. सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन महीने कालावधीसाठी मिटला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर