सोलापूर: एप्रिल महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात कोरोनाबाधित झालेल्या ७७९ पैकी केवळ बीबीदारफळमध्ये बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे तपासणीच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.
दरम्यान बरे झालेल्या ३४ व्यक्तींना गुरुवारी घरी सोडण्यात आले.
एप्रिल महिन्यात कळमण आरोग्य केंद्रातील गावामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित व मृत्यूही झाले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरला तालुक्यात ९२६ कोरोनाबाधित तर ४१ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात बाधित संख्या १७०५ व मृत्यू ६२ आहे.
बीबीदारफळ गावात केवळ एप्रिल महिन्यात १३० बाधित तर कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू आणि हदयविकाराच्या धक्क्याने, वृद्धापकाळाने १६ व्यक्तींचे निधन झाले. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसात झालेल्या ९४ तपासणीत अवघ्या तीन व्यक्ती बाधित निघाल्याची माहिती डाॅ. पूजा खराडे यांनी दिली. खेड येथील कोविड सेंटरमधून बरे झालेल्या ३४ लोकांना गुरुवारी घरी सोडले.
===
ऑक्सिजन कोणी देईना...
नान्नज येथे ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले असले तरी ऑक्सिजन मिळत नाही. याशिवाय बेड मिळत नसल्याने खेड येथील कोविड सेंटरमध्येच काहींना ऑक्सिजन लावला जातो. मात्र ऑक्सिजन मिळत नाही. आतापर्यंत कोविड सेंटरवर १५ बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला.