सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण ७५० उमेदवारांचे ७५१ अर्ज दाखल झाले.
बुधवारी एकाच दिवशी ५२२ अर्ज आले आहेत. ऑफलाइन १२९ अर्ज आल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत होती. यावेळेत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार रात्री उशिरापर्यंत ताटकळत उभे होते. मंगळवारपर्य॔त २२३ उमेदवारांचे २२४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी ५२२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. ऑनलाइन ३९३, तर ऑफलाइन १२९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
----
सेवालालनगर २४, भोगाव ३१, हगलूर ४८, वांगी २५, बेलाटी ३२, ति-र्हे ५१, राळेरास १२, एकरुख-तरटगाव ३०, खेड ७, भागाईवाडी २२, तळेहिप्परगा ५८, कळमण ३४, साखरेवाडी ११, बीबीदारफळ ५२, नान्नज ४३, गुळवंची ३९, वडाळा ३२, हिरज ३७, कोंडी ४२, पाथरी २२, तेलगाव २०, पडसाळी १५, होनसळ २३, बाणेगाव ३२ याप्रमाणे एकूण ७५१ अर्ज दाखल झाले आहेत.
ति-र्हे २३, हिरज २०, बेलाटी १०, पाथरी ९, बाणेगाव, तेलगाव व कोंडी प्रत्येकी ७, कळमण ६, राळेरास व एकरुख-तरटगाव प्रत्येकी ५, गुळवंची ४, बीबीदारफळ ३, तळेहिप्परगा २, होनसळ, पडसाळी, नान्नज, साखरेवाडी, भोगाव, वांगी प्रत्येकी एक याप्रमाणे ऑफलाइन अर्ज दाखल झाले.