थोडक्यात असे घडले की, कातेवाडी (ता.मोहोळ) रहिवासी जगन्नाथ पेठकर यांचा मुलगा दि. २३ च्या पहाटे पाचला घरातून निघून गेला होता. वडील टीव्हीवर कार्टून का बघू देत नाही?, अभ्यासाला मोबाईल देत नाही या कारणासाठी तो घरातून पळाला. वडील जगन्नाथ यांनी गावात इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पाहुणे-रावळे सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगा मिळून येत नव्हता. पेठकर यांनी तत्काळ कामती पोलीस ठाणे येथे आले. घडलेली हकीकत पोहॅको जीवराज कासविद यांना सांगितली. कासविद यांनी सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशचा शोध सुरू केला.घरातील मोबाईलही गायब असल्याच त्यांनी सांगितले.मोबाईल बंद असल्याने शोध घेणे अवघड होते. कालांतराने मोबाईलचे लोकेशन वेणेगाव ता. माढा येथे दाखवले.
लागलीच पोलीस कर्मचारी राहुल दोरकर, मुलाचे वडील जगन्नाथ पेठकर, मामा हे खासगी वाहनाने वेणेगाव ता. माढा येथे गेले. आजी-आजोबा यांच्याकडे मुलगा मिळून आला. मुलाला पाहताच वडिलांनी हंबरडा फोडला मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे त्या मुलाला ताब्यात घेऊन कामती पोलीस ठाणे आणण्यात आले. पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी मुलाचे व पेटकर कुटुंबीयांना समुपदेशन करून मुलाला कुटुंबाच्या ताब्यात दिले.
..................
कामती पोलीस ठाण्याच्या कामगिरीमुळे मला माझा मुलगा मिळाला आहे. सकाळी अभ्यासाला दिलेला मोबाईल दिवसभर वापरत असल्याने व वारंवार कार्टून का पाहतो म्हणून त्याला मी रागावलो होतो. मुलगा अचानक घरातून गेल्याने आम्ही घाबरलो होतो.
-जगन्नाथ पेटकर कातेवाडी ता.मोहोळ
.....................
मोबाईलच्या आधारे आज आम्हाला हा मुलगा शोधण्यास मदत झाली आहे.लहान मुलांचे संगोपन करताना आई-वडिलांनी त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यांच्या आवडी-निवाडीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अंकुश माने सहा.पोलीस निरीक्षक कामती पोलीस ठाणे