पंढरपूर : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.
आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया खाजगी इमारती यांचा सर्वेक्षण केले आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.
सर्व लहान मोठे माठांचे व्यवस्थापक, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणा?्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.