शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

आरक्षित जागेवरील घराच्या टॅक्स आकारणीसाठी सहकारमंत्र्यांना महापालिका बजावणार नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:19 PM

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावे शहरात जवळपास १० मिळकती याप्रकरणी काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी होटगी रोडवर आरक्षित जागेवर बांधलेल्या घराच्या मिळकत कर आकारणीसाठी महापालिका विशेष नोटीस बजावणार आहे. ही नोटीस देशमुखांना मान्य झाली तर कर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार मिळकत करासह इतर करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करीत आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावे शहरात जवळपास १० मिळकती आहेत. या मिळकतींकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महापालिकेकडून देण्यात आले आहे. होटगी रोडवर अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुखांनी बांधकाम केले आहे. या जागेवरील आरक्षण अद्याप कायम आहे. महापालिकेने न्यायालयात तशी माहिती दिली आहे. याप्रकरणी काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या कर आकारणी विभागाने काही दिवसांपूर्वी या जागेवरील बांधकामाची मोजणी केली. देशमुखांनी २०१२ साली या जागेवरील बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला होता. या परवान्यानुसार बांधकाम झाले आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. जवळपास सात हजार स्क्वेअर फुटावर बांधकाम करण्यात आले आहे. २०१२ पासून सप्टेंबर २०१९ या कालावधीपर्यंत पाच ते साडेपाच लाख रुपये मिळकत कराची आकारणी होते. या आकारणीची विशेष नोटीस देशमुखांना देण्यात येईल. या नोटिसीनुसार आकारणी मान्य झाल्यास वसुली करण्यात येणार असल्याचे कर आकारणी विभागातील अधिकाºयांनी सांगितले. न्यायालयीन सुनावणीत या घराचे बांधकाम अनियमित ठरल्यास काय करणार, असे विचारले असता कर आकारणी अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखविले. 

यांना नाहरकत प्रमाणपत्र- कर आकारणी विभागाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, श्रीशैल हत्तुरे यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. या शिवाय भाजपचे नगरसेवक डॉ. किरण देशमुख, एमआयएमच्या नगरसेविका वाहिदाबी भंडाले, फारुक शाब्दी, तस्लिम शेख, नागेश पासकंटी, दत्तात्रय वाघमारे, सल्लाउद्दीन शेख, आनंद चंदनशिवे, शोभा शिंदे यांनी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSubhash Deshmukhसुभाष देशमुख