अरुण बारसकरसोलापूर दि ८ : खासगी संघ गाईच्या दुधाला प्रतिलिटर २० रुपये शेतकºयाच्या हातात टेकवत असताना काहीच करू शकत नाही, असे हताशपणे सांगणाºया यंत्रणेने शासकीय आदेशाचे पालन न करता दोन रुपये व त्यापेक्षा कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकते.राज्यात सध्या दूध खरेदीचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. सहकारी व मल्टिस्टेट संघापेक्षा खासगी संघांची संख्या व संकलन अधिक आहे. खासगी दूध संघाने शासनाचा आदेश पाळला नाही तर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मल्टिस्टेट संघांनीही शासन आदेशाचे पालन नाही केले तर कारवाई करण्याचा अधिकार राज्यात कोणाला नाही. मात्र केंद्राकडे कारवाईसाठी अहवाल पाठविण्याची तरतूद आहे. दूध दरवाढ, शेतीपिकांना हमीभाव, संपूर्ण कर्जमाफीच्या विषयावरून राज्यातील शेतकरी संपावर गेल्यानंतर राज्य शासनाने गाय व म्हशीच्या दुधाचा खरेदी दर तीन रुपयांनी वाढविला होता. ही दरवाढ फक्त सहकारी दूध संघांनी देणे बंधनकारक आहे. पुणे विभागात जवळपास ६५ टक्के दूध खासगी संघ स्वीकारत असून ते गाईच्या दुधाला २१ व २० रुपयांचे दर देत आहेत. शासनाने जाहीर केल्यापासून कोणत्याही खासगी संघाने प्रति लिटर २७ रुपये दर दिला नाही. मात्र शासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही. एकीकडे खासगी दूध संघ शेतकºयांच्या हातावर प्रति लिटर २० रुपये टेकवत असताना शासनाचा दुग्धविकास विभागाने कमी दर दिल्याचा ठपका ठेवत ११ सहकारी संघांवर कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. पुणे विभागात सहकारी २३ संघ आहेत. -------------------गोकूळसह ११ संघांना नोटिसा...च्पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज)ने गाईच्या दुधाला प्रति लिटर २२ रुपये ७० पैसे तर बारामती तालुका दूध संघाने प्रति लिटर २१ रुपये ५० पैसे दर शेतकºयांना दिला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ), सातारा जिल्हा दूध संघ, कोयना सहकारी दूध संघ कराड, पाटण तालुका दूध संघ पाटण, फलटण तालुका दूध संघ, मोहोनराव पाटील दूध संघ मिरज, सोनहिरा दूध संघ कडेगाव, लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ विटा, वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघ तासगाव या ९ सहकारी संघांनी प्रति लिटर २५ रुपयांचा दर शेतकºयांना दिला असल्याने कारवाईच्या नोटिसा सर्व ११ संघांना बजावल्या आहेत. --------------------- कलम ७९ अ (३) व ब अन्वये कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे यांनी म्हटले आहे.- कलम ७९ अ अन्वये या बाबीला संचालक मंडळ जबाबदार असेल तर अपात्र करण्याची तरतूद आहे.- कलम ७९ ब अन्वये या बाबीला संस्थेचा संबंधित सेवक जबाबदार असेल तर त्याला काढून टाकण्याची तरतूद आहे.- १० दिवसात खुलासा देणे अपेक्षित असून त्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. ----------------सोलापूर जिल्हा दूध संघ व शिवामृतने शासन आदेशाप्रमाणे दर दिल्याने कारवाईचा प्रश्नच येत नाही. मल्टिस्टेटने कमी दर दिला तर अहवाल केंद्राला पाठविण्याचा अधिकार आहे, मात्र खासगी संघावर काहीही कारवाई करू शकत नाही. - सुनील शिरापूरकर,विभागीय उपनिबंधक (दुग्ध)
कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना कारवाईच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:05 AM
शासकीय आदेशाचे पालन न करता दोन रुपये व त्यापेक्षा कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकते.
ठळक मुद्दे या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकतेराज्यात सध्या दूध खरेदीचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले सहकारी व मल्टिस्टेट संघापेक्षा खासगी संघांची संख्या व संकलन अधिक