आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : क्लब हाऊसचा परवाना असताना बेकायदा बांधकाम करून मंगल कार्यालयाचा वापर करणाºया होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटजवळील कॅसल ग्रीनची भिंत मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने पाडून टाकली. याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी अंगद देवकते यांनी तक्रार केली आहे. यावरून मनपाच्या बांधकाम परवाना विभागाने दिलीप चव्हाण व बिद्री यांना बेकायदा बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती. त्यांनी काहीच हालचाल न केल्याने गेल्या महिन्यात मनपाच्या पथकाने जेसीबीने किचन व स्वच्छतागृहाचे पाडकाम केले होते. त्यावर इतर बांधकाम पाडकामासाठी परवानाधारकांनी मुदत मागून घेतली होती. पण यावर तक्रारदार देवकते यांचे समाधान झाले नाही. त्यांनी याबाबत लोकशाही दिनात तक्रार मांडली. मनपाच्या अधिकाºयांनी जाणूनबुजून मंगल कार्यालय चालविण्यास झुकते माप दिल्याचा आरोप केला. ज्या ठिकाणी क्लब हाऊसचा परवाना घेतला तेथे २०११ पासून मंगल कार्यालय चालविण्यात येत आहे. बाजूने कुंपण घालून आत बाग व क्लबच्या आठ खोल्यांचा वापर यासाठी केला जात आहे. पाडलेले किचन पुन्हा पूर्ववत केल्याचे त्यांनी निदर्शनाला आणले होते. त्यावर मनपाच्या पथकाने पुन्हा कारवाई केली. प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली एक भिंत पथकाने जेसीबीने पाडून टाकली. यावेळी तक्रारदार देवकते उपस्थित होते. प्रवेशद्वार व कुंपणाचे बेकायदा बांधकाम पाडावे, अशी त्यांनी मागणी केली. पण परवान्यापेक्षा जादा बांधकाम इतकेच असल्याचे सांगून पथकातील अवेक्षक एकबोटे व कर्मचारी परतले. कायद्याप्रमाणे कारवाई न झाल्यास फौजदारी करण्याचा इशारा देवकते यांनी दिला. पाडकाम नियमाप्रमाणे झाले की नाही याची पुन्हा तपासणी केली जाईल, असे बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.----------------------------नियमितीकरणाकडे दुर्लक्ष....बेकायदा बांधकाम करणाºयांना नियमितीकरणास शासनाने परवानगी दिली आहे. ज्यांना नोटिसा दिल्या त्यांनी अद्याप याबाबत अर्ज दिलेला नाही. अशा १९ जणांना अंतिम नोटीस बुधवारी जारी करण्यात आली. यात शिवप्रकाश चव्हाण (अक्कलकोट रोड), श्रीकांत डोंबे, प्रसाद श्रीराम, अनिल श्रीराम, सुभांशु भालेराव, राहुल दबडे (रविवारपेठ, अक्कलकोट रोड), पद्मालय हॉलच्या राजश्री चिंदे (नूतननगर), राजमाता गार्डनचे शिवलिंग म्हेत्रे व इतर, मर्दा मंगल कार्यालयाचे नवनीत मर्दा, बोल्ली मंगल कार्यालयाचे नारायण काळपगार, उषा लॉनचे किशोर अंबुरे, भाऊसाहेब गायकवाड, सविता गायकवाड (न्यू पाच्छापेठ), श्रीनिवास चिलका, महेश ठाकरे, राजेंद्र सिंगी व इतर (भद्रावतीपेठ), डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. अभिजित वाघचवरे (होटगी रोड), शोभा गायकवाड, शुभांगी हिरेमठ, वैभव मेरू, साजीद सय्यद, (रेल्वेलाईन), डॉ. संतोष आडके, निलांबरी आडके (बेडर पूल), डॉ. नितीन तोष्णीवाल (रिमांड होमजवळ) यांचा समावेश आहे.
सोलापूरात बेकायदा बांधकाम पाडकाम सुरू, महानगरपालिकेची कारवाई, बांधकाम नियमित न करणाºयासाठी पाठविल्या नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:04 PM
क्लब हाऊसचा परवाना असताना बेकायदा बांधकाम करून मंगल कार्यालयाचा वापर करणाºया होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटजवळील कॅसल ग्रीनची भिंत मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने पाडून टाकली.
ठळक मुद्देबांधकाम पाडकामासाठी परवानाधारकांनी मुदत मागून घेतलीबेकायदा बांधकाम करणाºयांना नियमितीकरणास शासनाने परवानगी दिलीपाडकाम नियमाप्रमाणे झाले की नाही याची पुन्हा तपासणी केली जाईल : उपअभियंता रामचंद्र पेंटर