पशु संवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत जनावरांसाठी लाळीची घरपोच लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुधन आधार नोंदणीमुळे पशुपालकांना नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई मिळण्यासाठी मदत होणार आहे. तसेच आता खरेदी-विक्री करताना आधार कार्ड असणे गरजेचे राहणार आहे. संसर्गजन्य आजारासाठी उपचार करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यासाठी गाय व म्हैस वर्गातील पशुधनास टँगिंग हेच त्याचे पशू आधारकार्ड आहे.
सध्या आगळगाव परिसरामध्ये हे काम जोमात सुरू असून, जनावरांनाही बारा अंकी आधार कार्ड मिळणार आहे. त्यामुळेच भविष्यात माणसाच्या आधारकार्डसारखी जनावराची इत्थंभूत माहिती एकाच लिंकवर मिळणार आहे.
आगळगाव पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत बारागावची एकूण पशुधन संख्या ६ हजार असून, त्यापैकी ४ हजार ४२५ जनावराचे बिल्ले मारून लसीकरण केल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी महेंद्र कोळेकर यांनी दिली. हे लसीकरण पशुधन विकास अधिकारी महेंद्र कोळेकर, पर्यवेक्षक राजेश कुंभार व परिचर प्रवीण डोळे यांनी केले.
फोटो
आगळगाव०१
ओळी
पशुसंवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत जनावरांसाठी १२ अंकी आधारकार्ड मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पशुधन विकास अधिकारी महेंद्र कोळेकर, पर्यवेक्षक राजेश कुंभार, पशुधन विकास अधिकारी महेंद्र कोळेकर, पर्यवेक्षक राजेश कुंभार व परिचर प्रवीण डोळे.