सोलापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह आता नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार आहे. परंतु, नातेवाईकांना मृतदेह घरी न नेता थेट स्मशानभूमीत घेऊन जावा, असे निर्देश गुरुवारी जाहीर करण्यात येतील, असे उपायुक्त धनराज पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाबाधित मृतदेहांवर महापालिका, नगरपालिका यांच्याकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र अलीकडच्या काही दिवसांत मृतदेह मिळावा, यासाठी नातेवाईकांकडून आग्रह केला जात आहे. त्यानुसार निर्देशाची पडताळणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
नातेवाईकांनी पीपीई किट घालून आणि चार ते पाच व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत. मृतदेह घरी घेऊन जाण्यास मनाई असेल, असेही पांडे यांनी सांगितले. गुरुवारी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे.