सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास काढला.
दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे, तत्पुर्वी शासनाने काही उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले होते, त्यानुसार शासनाने १९ मे २०२० रोजी दिलेल्या सुचनेनुसार रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक चालू करण्यास परवानगी दिली आहे, त्याचबरोबरच सांसर्गिक क्षेत्र (कंटेन्ममेंट झोन) बाहेरील सर्व विद्युत यंत्रमाग व हातमाग चालू करण्यास परवानगी दिली आहे.
या कारखान्यांसाठी लागणाºया मालाची वाहतुक करणारे कर्मचाºयांना आयएलआय हा आजार नसल्याची वैद्यकीय दृष्यया तपासणी करून खात्री करावी असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे़ तसेच प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र मधील कोणत्याही व्यक्तीला औद्योगिक आस्थापनामध्ये काम करण्यास परवानगी देता येणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्ती, संस्था, अथवा संघटना यांच्याविरूध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.