सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सोलापूरातील 'कोरोना'बाधितांची संख्या २१ ने वाढली आहे. आता सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या ४५६ इतकी झाली आहे. आज एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आज १९४ अहवाल आले यात १७३ निगेटिव्ह तर २१ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आत्तापर्यंत एकूण ४७७३ जणांची चाचणी घेण्यात यातील ४६१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ४१५६ निगेटिव्ह तर ४५६ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आजून १३१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आज एक जणाचा मृत्यू कोरोनामुळं झाला असून मृतांची संख्या आता ३० झाली आहे. तर आत्तापर्यंत बरे झाल्यानं १६८ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. आज ज्या व्यक्तीची मृत म्हणून नोंद झाली आहे ती बुधवारपेठ परिसरातील ६५ वर्षीय पुरूष असून १५ मे रोजी सारीचा त्रास होवू लागल्यानं उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दिनांक १८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अहवाल आज आला.
सध्या रूग्णालयामध्ये २५८ जणांवर उपचार सुरू आहेत. यात १३५ पुरूष तर १२३ महिलांचा समावेश आहे. मृत ३० मध्ये १८ पुरूष तर १२ महिलांचा समावेश आहे.