सोलापूर : सोलापुरात मागील बारा तासात सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापुरात आता एकूण रुग्णांची संख्या ५९० झाली असून आतापर्यंत ५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात मागील काही दिवसांपासून वाढत चाललेली रुग्णांची संख्या पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.
रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १०२ रुग्णांच्या तपासणी अहवालात सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९० झाली आहे. आत्तापर्यंत सोलापुरातील २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे
वाढता कोरोना संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करत असताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.
सोलापूर आजचा अहवालदि.25/05/20 सकाळी 8.00
- आजचे तपासणी अहवाल - १०२
- पॉझिटिव्ह - ७ (पुरुष - ४ स्त्री - ३)
- निगेटिव्ह - ९५
- आजची मृत संख्या - १
- एकुण पॉझिटिव्ह- ५९०,
- एकुण निगेटिव्ह - ५०५५
- एकुण चाचणी - ५६४५
- एकुण मृत्यू - ५२
- एकुण बरे रूग्ण - २५४