गावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, माजी उपसरपंच अनिल घाडगे, ग्रामविकास आधिकारी विष्णू गवळी, पोलीसपाटील मनीषा कांबळे, वैद्यकीय अधिकारी व कोरोना ग्राम समितीच्या मार्गदर्शनाखाली दोनवेळा संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवले होते. उपाययोजना करूनही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. गावात चार महिन्यांत तब्बल ७३ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तसेच ९ डिसेंबर रोजी सुस्तेत पहिला कोरोनाबळी गेल्याची माहिती आरोग्यसेविका सरस्वती चौगुले यांनी दिली.
कोट :::::: सुस्ते गावात कोरोनाबाधित रुग्णांची झापाट्याने वाढ होत आहे. यावर उपाययोजना राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कळविले आहे. मी स्वतः दोन दिवसांनी सुस्ते गावाला भेट देणार आहे.
- डाॅ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर
----
कोरोनापासून बचाव होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, चौकात बोर्ड लावले आहेत. तरीही नागरिक कोणत्याही नियमाचे पालन करत नाहीत. यापुढे तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- विष्णू गवळी, ग्रामविकास आधिकारी, सुस्ते