शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

सुस्तेत कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:36 AM

कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रुग्णालयात वेळेत उपचार मिळत नाहीत. अशातच सुस्तेत २५ ...

कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रुग्णालयात वेळेत उपचार मिळत नाहीत. अशातच सुस्तेत २५ मार्चपासून दररोज नऊ ते दहा कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामसमितीने सात दिवसांचा जनता कर्फ्यू केला होता. या सात दिवसांच्या गाव बंदीने कोरोनाची साखळी तोडण्यास काहीही मदत झाली नाही. २५ मार्चपासून आजअखेर सुस्तेत कोरोना बाधितांचा आकडा ११० वर जाऊन पोहोचला आहे. ८० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले, तर ३० रुग्ण खासगी व जिल्हा उपरुग्णालय, ६५ एकर येथील कोविड सेंटर, श्रीदत्त विद्या मंदिर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आरोग्यसेविका चौगुले यांनी दिली.

१७ जण निगेटिव्ह आढळले

सुस्ते येथे तुंगत आरोग्य केंद्रामार्फत कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी २५ पैकी १७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. सुस्ते येथील सहा पॉझिटिव्ह, बाहेर गावचे दोन असे आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यावेळी उपसरपंच तुषार चव्हाण, जीवन रणदिवे, भैय्या फडतरे, अजिंक्य वाघमारे, बंडू कोळी, मुख्याध्यापक सुभाष अधटराव, डाॅ.अमित रोकडे, आशा वर्कर संगीता चव्हाण, पाटील आदी उपस्थित होते.

फोटो :::::::::::::::::::::

सुस्ते (ता. पंढरपूर) येथे कोरोनाची तपासणी करताना डाॅ.अमित रोकडे व उपस्थित कर्मचारी.