दक्षिण सोलापूर तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा प्रसार वाढत होता. शहराच्या नजीक असलेल्या गावांत रुग्णांची संख्या वाढली. पहिल्या टप्प्यात कर्देहळ्ळी, होटगी, हत्तुर या गावांवर लक्ष केंद्रित करून तेथील बाधित परिसर मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले.
आरोग्य खात्याने तपासण्या वाढविल्या, त्याचा मोठा लाभ झाला. याच दरम्यान आरोग्य विभागाने बाधित रुग्णांची शोध मोहीम हाती घेतली. त्याचाही चांगला परिणाम झाला.
------
कोरोनामुक्त झालेली गावे
बंकलगी, सिंदखेड, दोड्डी, घोडातांडा, कासेगाव, संगदरी, उळेगाव, दिंडूर, बसवनगर, मद्रे, औज (आ), वरळेगाव, शिरपन्हाळी, हणमगाव, होनमुर्गी, पिंजारवाडी, संजवाड, हत्तरसंग, गावडेवाडी, तीर्थ, सावंतखेडतांडा.
--------
विलगीकरण केंद्रातील गर्दी ओसरली
कोरोनाबाधित रुग्णांसाठी कंबर तलावानजीक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कॉलेज विलगीकरण केंद्र करण्यात आले. ३३८ बेडची क्षमता असलेल्या या केंद्रात एप्रिल अखेर रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक राहिली. मे महिन्याच्या मध्यानंतर ही संख्या ओसरत राहिली. आता या केंद्रात अवघे ६० रुग्ण आहेत.
-----
लसीकरणाची ऐशीतैशी
उशिराने जाग आलेल्या ग्रामीण भागातील नागरिक आणि शहरी नागरिक यांच्यात लस घेण्यावरून संघर्ष सुरू झाला. गेल्या महिनाभरात होटगी, वळसग, कुंभारी, बोरामणी, हत्तुर, वडकबाळ, बसवनगर, मंद्रूप, औराद, कंदलगाव येथे लस मिळत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
-----
नागरिकांना लस कोठेही घेता येते. परंतु सोलापूर शहरातील जागरूक नागरिकांनी गर्दी केल्याने ग्रामीण भागातील लोकांना लस मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र लसींचा कोटा वाढवून देण्याची आमची मागणी आहे.
- राजेंद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ता, हत्तुर
------------
सद्य:स्थिती रुग्णांची संख्या :
१७६४ मृत झालेले : १०१ बरे होऊन घरी गेलेले : १२५६ सक्रिय रुग्णांची संख्या : ३९८ आयसीयू बेडचे रुग्ण : ४० ऑक्सिजन बेडचे रुग्ण : ४३ विलगीकरणातील रुग्ण : ४७३ कन्टेन्मेंट झोन जाहीर : २५२ चालू कन्टेन्मेंट झोन : ३९ बंद कन्टेन्मेंट झोन : २१३
-------