कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रुग्णालयात वेळेत उपचार मिळत नाहीत. अशातच सुस्तेत २५ मार्चपासून दररोज नऊ ते दहा कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्राम समितीने सात दिवसाचा जनता कर्फ्यू केला होता. या सात दिवसांच्या गावबंदीने कोरोनाची साखळी तोडण्यास काहीही मदत झाली नाही. २५ मार्चपासून आज अखेर सुस्तेत कोरोना बाधितांचा आकडा १३६ वर जाऊन पोहोचला आहे. ८० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले, तर ५६ रुग्ण खासगी व जिल्हा उपरुग्णालय, ६५ एकर येथील कोविड सेंटर, श्रीदत्त विद्या मंदिर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य सेविका चौगुले यांनी दिली.
१७ जण निगेटिव्ह आढळले
सुस्ते येथे तुंगत आरोग्य केंद्रामार्फत कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी २५ पैकी १७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. सुस्ते येथील सहा पॉझिटिव्ह, बाहेर गावचे दोन असे आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यावेळी उपसरपंच तुषार चव्हाण, जीवन रणदिवे, भैया फडतरे, अजिंक्य वाघमारे, बंडू कोळी, मुख्याध्यापक सुभाष अधटराव, डाॅ. अमित रोकडे, आशा वर्कर संगीता चव्हाण, पाटील आदी उपस्थित होते.
फोटो :::::::::::::::::::::
सुस्ते (ता. पंढरपूर) येथे कोरोनाची तपासणी करताना डाॅ. अमित रोकडे व उपस्थित कर्मचारी.