अकलूज येथील उदय सभागृहात शिवरत्न शिक्षण संस्थेच्या विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड काॅलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बी.एस्सी. (नर्सिंग), जीएनएम व एएनएम विभागातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण व दीपप्रज्वलन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांची कन्या सोनाली मोदी, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, सचिव शिवदास शिंदे, संचालक डाॅ. एम. के. इनामदार, डाॅ. विश्वनाथ आव्हाड, नितीन बनकर, प्रशांत जगताप, श्रीकांत राऊत, धर्मराज दगडे, डाॅ. नितीन राणे, पराग गायकवाड, तानाजी काशिद, इशा कोळेकर, हेमलता रणवरे, अशरफ शेख आदी उपस्थित होते. प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी नर्सिंगची शपथ घेतली.
प्रास्ताविकात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिवरत्न संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत नर्सिंग काॅलेजचे प्राजक्ता पानसकर, विष्णू केंद्रे व सोफिया बागवान या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले. प्राजक्ता पानसकर ही नागपूरच्या एम्स रुग्णालयात तर नवनाथ कराड हा परदेशात कार्यरत असल्याचे सांगितले. पूर्वी केंद्रातून येणारा निधी राज्यात लाभार्थींपर्यंत पोहचेपर्यंत कमी होत होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लाभार्थींच्या खात्यात थेट संपूर्ण निधी जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रल्हाद मोदी म्हणाले, अकलूज हे ग्रामपंचायतीचे गाव असून मोहिते-पाटील परिवाराने महानगरपालिकेएवढा विकास केला आहे. तरुणांसाठी उच्च शिक्षणाची व रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. आज नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हाती दीप घेऊन शपथ घेताना साक्षात सूर्यनारायणला साक्षी ठेवले आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांनी सरकारचे नियम व सूचनांचे पालन करून आपले वर्तन ठेवावे. कोरोनाबाबत प्रसार माध्यमांनी देशवासीयांचे आत्मबल वाढेल, असे सकारात्मक वृत्तांकन करावे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संवेदना बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेचे सूरज मस्के व स्वप्निल शहाणे उपस्थित होते. सूत्रसंचालन अरविंद काळे व पूजा चवरे यांनी केले, तर विनायक डांगे यांनी आभार मानले.
230721\20210723_113539.jpg
अकलुज येथील विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग कॉलेजच्या दिप प्रज्वलन व शपथग्रहण समारंभात प्रल्हाद मोदी,धैर्यशील मोहिते-पाटील,सोनल मोदी,ईशा कोळेकर आदी