अध्यक्षस्थानी प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे हे होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या सहयोगाने एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली युनिसेफ या संस्थेच्या अर्थसहाय्याने पोषण मूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्प राबविण्यात येत आहे. महिला व बालकांमधील कुपोषण निर्मूलन करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तांत्रिक चर्चासत्रात दिनेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांकरिता अन्न व पोषण अभियान, अन्न, आहार व आरोग्य, संतुलित आहार, अन्नातील पोषणतत्वे, पोषणमूल्यांचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व, जैवसमृध्द पिकांचे वाण, शाश्वत पोषणासाठी पोषणमूल्य आधारित शेती पद्धती व पोषण परसबाग याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. पंकज मडावी यांनी आभार मानले. या प्रशिक्षणात डॉ. शरद जाधव, डॉ. सूरज मिसाळ, सुयोग ठाकरे, तुषार आहिरे, रवी साखरे, नितीन बागल, अरुण गांगोडे आदींनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांना पोषण मूल्य आधारित शेतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:25 AM